द्विज

कोलाहलात चालला चहुकडे कावळ्यांचा सोहळा

द्विज घेत मनी मज निर्मितीचा डोहाळा

एकटा मी असू दे, हसताना गिधाडे सारी

गरुडाचा रुबाब अन् ती गरुडझेप न्यारी

दुथडी भरुनी येथे दोन्ही वाहत काठ होते

वांझोटा तो आव अन् घेणारे माठ होते

ओंजळी फाटकी तयांची, खोटारडे माप होते

मज म्हणे तुझेच ते चोरटे हात होते!!

आपल्या रक्तासवे का अशी ही लढाई

तुज वाटले तुझी चालली शत्रूवर चढाई..?

आयुष्यात सुखाचा हा चोरटा डाव होता

अश्रुंचाही तुमच्या कोरडा रडण्याचा आव होता

मागणे तुझे घेऊन तरी जिदद माझ्या प्राणांची निघाली

रीत न्यारीच जगीची, अशी कशी ही प्रणाली?

धुंदीच्या अजुनी जरी इतरही वाटा

वेदनेचा मज लागला हा शौक आता

वेदनेची दाट जत्रा, भुरट्याचा चोरटा पहारा

मरणाची वाट एकाकी, जिवंतपणी कशाला खांद्यांचा सहारा?

पुरे तो शोक, रडारड अन् त्या केविलवाण्या बाता

माझिया पोटीच माझा घेतला मी जन्म आता!

Advertisements

About Mukesh Bhavsar

Mukesh has done BE Civil from Mumbai University and masters in HRM from Tata Institute of Social Sciences (TISS). He has worked for a couple of NGOs in India and abroad. He has also written for some newspapers and magazines on different social issues. Mukesh is interested in entrepreneurship, writing, social work, travelling, and photography. Follow him on twitter- https://twitter.com/mukeshbhavsar88
This entry was posted in poems. Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s