महात्मा

२६/११ चा मुंबई वरचा अतिरेकी हल्ला प्रत्यक्ष पाहून आल्यावर लिहिलेली कविता…

एक महात्मा त्या दिवशी
तीन माकडे कुरवाळीत बसला होता
काफिरांनी तेव्हाच त्याचा
चष्मा चोरुन नेला होता

स्वातंGandhiji Line Drawingsत्र्याचा दिवस होता
तिरंगा उंच फडकत होता
भगव्या, हिरव्या, निळ्या कापडात
महामा मात्र गुदमरत होता…

गोऱ्याऐवजी काळा आज
देश खरवडून काढतो आहे
स्वीसमध्ये महात्म्याला
जबरदस्तीने धाडतो आहे

मागच्या चौकटीत महात्मा
तरीदेखील हसत असतो
टेबलाखालचा हात
त्याला बहुदा दिसत नसतो

‘भारत माझा देश आहे’ची प्रतिज्ञा घेतांना
म्हणूनच हात आज थरथरतो आहे
कारण स्वार्थासाठी लोकांनी
माझ्या देशाचा आत्मा विकायला काढला आहे..!

About Mukesh Bhavsar

Mukesh is an engineer turned HR professional but rather much more than that. An explorer in all senses Mukesh likes to put himself to good use volunteering for NGOs, travelling the world, expressing himself through word and photographs, and making new friends. He is a global citizen with a global outlook!
This entry was posted in Change, poems and tagged , , , , , . Bookmark the permalink.

1 Response to महात्मा

Leave a comment